
सामना ऑनलाईन । हजारीबाग
झारखंडमधील हजारीबागमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. चकमक पिपरवार येथील तडवा जंगलात झाली. घटनास्थळाहून मोठ्या शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहे.
सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार केरेडारी या भागात झारखंड पोलिसांच्या मदतीने 190 बटालियनकडून शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत तीन लक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहेत, असे सीआरपीएफचे आईजी संजय लाटकर यांनी सांगितले.






















































