स्वातंत्र्यदिनी शस्त्रसंधीचे उल्लंघन, हिंदुस्थानच्या कारवाईत 3 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही सीमारेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना हिंदुस्थानच्या चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला हिंदुस्थानच्या जवानांनी जशास तसे उत्तर दिले. हिंदुस्थानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 3 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुंछ, उरी आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत तुफान गोळीबार केला. हिंदुस्थानने देखील पाकिस्तानवर कारवाई करत प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात पाकिस्तानच्या 3 जवानांचा मृत्यू झाला. नाईक तनवीर, सेपोए रमजान आणि नाईक तैमूर असे मृत्यू झालेल्या जवनांची नावे आहेत.