यूएएन-आधार लिंकसाठी 30 जून डेडलाइन

इम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ईएलआय) योजनेअंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्याची तारीख 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत, जर कर्मचाऱयाचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनी व्यक्तीला एकरकमी विमा रक्कम दिली जाते. ही विमा रक्कम 7 लाखांपर्यंत असू शकते.