जवानांसाठी 30 हजार कडकनाथ अंडी रवाना

2197

जलप्रलयाचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगलीतील हजारो नागरिकांसाठी दिवसरात्र बचावकार्य करणाऱया सैन्यातील तसेच एनडीआरएफचे जवान व पोलिसांसाठी नाशिकचे उद्योजक संदीप सोनवणे यांनी आज प्रोटीनयुक्त तीस हजार कडकनाथ अंडी पाठविली आहेत. या परिपूर्ण आहारामुळे जवानांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. ही अंडी उकडून त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

या अंडय़ांमध्ये प्रोटीन व लोहचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यातील औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते, असे सोनवणे यांनी सांगितले. अंडी पाठविण्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालय आणि कोल्हापूर येथील अधिकाऱयांशी चर्चा करून आपण वाटपाचे नियोजनही केले आहे, असे ते म्हणाले. या विशेष पथकात प्रशांत गुजराथी, प्रितम भट, अभिजीत इंगोले, संदीप पंचभाई, सुदाम राठोड, भानुदास महाले व दिलीप राठोड यांचा समावेश आहे. हे पथक कोल्हापूर येथील मदत शिबिरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन स्वास्थ्यपूर्ण असलेल्या या अंडय़ांचे वितरण करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या