पुनित राजकुमारच्या प्रेमाखातर… दररोज 30 हजार चाहते स्मारकाजवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर रोजी वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनितच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दहा दिवस उलटूनही चाहते या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. पुनितच्या स्मारकाजवळ दररोज 30 हजार चाहते पोचत आहेत. पुनितच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून प्रार्थना करत आहेत.

पुनित राजकुमारचे फॅन फॉलॉइंग किती मोठय़ा प्रमाणात आहे, याची प्रचीती येत आहे. त्याच्या मृत्यूनंतर तर याचे अधिक प्रमाणात दर्शन घडत आहे. बंगळुरू येथील कांतीरवा स्टुडियोमध्ये पुनितचे स्मारक आहे. या स्मारकाला चाहते भेट देत आहेत. सुमारे 300 पोलीस अधिकारी, बंगळुरू शहर पोलीस, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात येत आहे.