कानपूर हिंसाचारप्रकरणी 36 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानपूरमध्ये दोन समाजांत झालेल्या  हिंसाचारप्रकरणी पोलसांनी तीन गुन्हे दाखल करत 36 जणांना अटक केली आहे. तसेच येताम खाना आणि परेड क्रॉस रोड परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली असल्याचे पोलीस आयुक्त विजय सिंग मीना यांनी स्पष्ट केले आहे. कानपूर मार्केट बंद करण्यावरून झालेल्या वादातून दोन समाजांत येथे मोठा हिंसाचार उसळला होता. यामध्ये दोन नागरिकांसह एक पोलीस जखमी झाला होता. तसेच मोठय़ा प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.