‘लॉ’च्या 14 हजार जागांसाठी,36 हजार 513 विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

‘लॉ’च्या राज्यभर 14 हजार 320 जागा असून या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी तब्बल 36 हजार 513 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या 44 हजार 431 किद्यार्थ्यांपैकी 7 हजार 918 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले होते.

गेल्या तीन कर्षांच्या तुलनेत यंदा एमएएच एलएलबी-3च्या सीईटीला किक्रमी नोंदणी झाली होती. तब्बल 44 हजार 431 किद्यार्थ्यांनी यंदा अर्ज केले होते. हा आकडा गेल्याकर्षी 32 हजार 336 इतका होता. राज्याबाहेरील 3 हजार 626 किद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

एमएचटी-सीईटीचा आज निकाल

औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या (दि. 4) सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. एमएचटी-सीईटीच्या www.mahacet.orgया अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. सुमारे 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.