
सेलू शहरातील नाला रोड मारोती मंदिर मारवाडी गल्ली परिसरात एका व्यक्तिने राहत्या घरी बुधवार, 10 मार्च रोजी सायंकाळी 6:50 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सेलू शहरातील नाला रोड मारोती मंदिर मारवाडी गल्ली परिसरात संतोष नागनाथ चांदजकर (37) याने राहत्या घरी बुधवारी 6:50 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस नायक बाळू पूरणवाड, पोलीस नायक सुनील वासलवाड, पोलीस नायक सय्यद रहीम यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृत संतोष चांदजकर यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. गुरुवारी शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.



























































