
तामिळनाडूमधील वानियांबडी येथे एका खाजगी संस्थेने आयोजित केलेल्या मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. थाईपूयम सण उत्सवाचा भाग म्हणून येथे मोफत साड्यांचे वाटप केले जात होते. या कार्यक्रमात सुमारे एक हजार महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी साड्या लवकर मिळाव्यात म्हणून काही महिला पुढे गेल्या आणि अचानक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत चार महिलांचा मृत्यू झाला. तर अनेक महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.



























































