44 लाख डोस नासवले, तामीळनाडूत सर्वाधिक नुकसान

देशातील अनेक भागांत कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असतानाच लाखो डोस वाया जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. देशभरात पुरवठा केलेल्या एकूण लसींपैकी तब्बल 44 लाख 78 हजार डोस वापराविना फेकून दिले गेले. लसीचे सर्वाधिक डोस तामीळनाडूत वाया गेले आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशात समाधानकारक स्थिती आहे.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात ही माहिती उघड झाली आहे. देशात 11 एप्रिलपर्यंत 10 कोटी 34 लाख लसींच्या डोसचा योग्य पद्धतीने वापर केला गेला. मात्र, 44 लाख 78 हजार डोस वाया गेले. वाया गेलेल्या डोसचे प्रमाण तब्बल 23 टक्के आहे.

लस वाया गेलेली टॉप पाच राज्ये

राज्यांना पुरवठा केलेल्या लसींपैकी ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक डोस वाया गेली ती टॉप पाच राज्ये आणि पंसात वाया गेलेल्या डोसची टक्केवारी – तामीळनाडू (12.10), हरयाणा (9.74 ), पंजाब (8.12), मणिपूर (7.80), तेलंगणा (7.55).

काही राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये योग्य वापर

पुरवठा करण्यात आलेल्या लसींचा योग्य वापर काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात झाला आहे. केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दिव-दमण, अंदमान-निकोबार आणि लक्षद्विप.

पाच राज्यांमध्ये समाधानकारक स्थिती

काही राज्यांमध्ये वाया गेलेल्या लसींचा आकडा जास्त दिसत असला तरी, पुरवण्यात आलेल्या लसींच्या तुलनेत लस नासाडीच्या प्रमाणाची टक्केवारी कमी आहे.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या पाच राज्यांमध्ये लस कमी वाया गेली. या राज्यांची कामगिरी समाधानकारक स्थिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या