मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सापडलेले रसायनशास्त्राचे 45 प्रश्न तंतोतंत जुळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीसंदर्भात सुरू असलेल्या सीबीआय चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संस्थापक शिवराज मोटेगावकर याच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाचे सर्व 45 प्रश्न जसेच्या तसे आढळले. ही माहिती सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून उघड झाली आहे.

नीट परीक्षेसाठी प्रत्येकी 180 प्रश्नांचे चार ‘मास्टर सेट’ तयार केले जातात. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राच्या प्रश्नांचा समावेश असतो. या चारपैकी दोन संचांची छपाई करून ते परीक्षा पेंद्रांवर वितरीत केले जातात. 2026 च्या परीक्षेसाठी ‘पैलास’ आणि ‘शिवालिक’ हे दोन प्रशासकीय कोडनाव असलेले संच वापरण्यात आले होते. मोटेगावकर याच्या मोबाईलमधून रसायनशास्त्राचा पेपर जप्त करण्यात आला होता. त्याची या मास्ट सेटसोबत तुलना केल्यानंतर सीबीआयला धक्काच बसला. शिवालिक या सेटमधील रसायनशास्त्राचे सर्व 45 प्रश्न मोटेगावकरच्या मोबाईलमधील प्रश्नांशी तंतोतंत जुळले. पैलास सेटमधील 45 पैकी 43 प्रश्न जुळले. इतर मास्टर सेटमधील 40 आणि तिसऱया सेटमधील एक प्रश्न जुळला.

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचा धक्कादायक खुलासा; पुरवणी आरोपपत्रातून माहिती उघड

सराव परीक्षेत सेटमधील प्रश्न

सीबीआयने दिल्लीच्या जलद गती न्यायालयात 28 जुलै रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, एअरड्रॉपच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका आणि साहित्य पसरवण्यात आले होते. सराव परीक्षेच्या नावाखाली मुख्य प्रश्नांचा सराव करून घेण्यात आला. मोटेगावकरने 19 एप्रिलच्या सराव परीक्षेत 15 प्रश्न पैलास सेटमधून, 30 एप्रिलच्या परीक्षेत शिवालिक सेटमधील 6 व दुसऱया सेटमधील 5 प्रश्न जसेच्या तसे समाविष्ट केले होते, असे सीबीआयने म्हटले आहे.