पाच वर्षांच्या मुलीवर झाली लिंग दुरुस्तीची शस्त्रक्रिया

सामना ऑनलाईन । मुंबई

बीड येथील पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या ललिता साळवे यांच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांच्याच गावातील एका पाच वर्षांच्या मुलीवर लिंग दुरुस्तीची शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली. रुक्सार असे त्या मुलीचे नाव असून तिच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग दुरुस्तीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुक्सार हिचे लिंग व्यवस्थित विकसित न झाल्याने तिला मुलगी मानण्यात आले होते मात्र ती मुलगी नसून मुलगा असल्याचे समजल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता रुक्सारचे नाव बदलून अमन ठेवण्यात आले आहे.

ललिता साळवेंच्या शरीरात महिलेचे एकही लक्षण नाही डॉक्टरांचा खुलासा

रुक्सार जन्मली तेव्हा डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना मुलगी जन्मली म्हणून सांगितले होते. मात्र लहानपणापासूनच रुक्सारमध्ये काहीतरी वेगळे असल्याचे तिच्या आईला जाणवत होते. त्यामुळे तिच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी रुक्सारवर कॅरियोटायपिंग केल्यानंतर ती मुलगी नसून मुलगा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे रुक्सारला लिंग दुरुस्तीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. सध्या रुक्सारच्या लिंगाच्या उजव्या बाजूवर शस्त्रक्रियाा करण्यात आली असून काही दिवसांनी डाव्या बाजूवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या तिच्यावर हार्मोन थेरपी सुरू असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाजूकडील शस्त्रक्रिया झाल्यानंतरही रुक्सारला काही महिने तपासणीसाठी मुंबईत यावे लागणार आहे.

SUMMARY : 5-year-old child undergoes sex reassignment surgery