वॉटर प्युरिफायरच्या आड चरसची तस्करी 50 लाखांचे चरस केले जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वॉटर प्युरिफायरच्या आड चरस तस्करीचा प्रकार समोर आला आहे. नाकाxटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने कारवाई करून 50 लाखांचे चरस जप्त केले आहे. या पार्सलप्रकरणी ‘एनसीबी’ने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

मुंबईहून ऑस्ट्रेलिया येथे जात असलेल्या एका पार्सलमध्ये चरस असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली. त्या माहितीनंतर ‘एनसीबी’च्या अधिकाऱयाने ते पार्सल ताब्यात घेतले. ते पार्सल उघडले असता त्यात 50 लाखांचे चरस होते. ते पार्सल कोणी पाठवले याची माहिती ‘एनसीबी’ने काढली. तेव्हा ड्रग्ज रॅकेटमध्ये एक कुरीअर पंपनीची फ्रँचाइझी सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ‘एनसीबी’ने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. कुरीअर पंपनीच्या एजंटने ते पार्सल नीट न तपासता तो ते पुढे पाठवत होता. त्या एजंटच्या माध्यमातून अनेक वेळा पार्सल परदेशात गेल्याचे तपासात समोर आले आहे. ड्रग्जप्रकरणी ‘एनसीबी’ने गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.