आत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती

46

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर आत्तापर्यंत 51 महिलांनी शबरीमला मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहिती केरळ सरकारने दिली आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारतर्फे सांगण्यात आलं की या महिलांनी मंदिरात जाऊन अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयांने महिलांवर असलेली मंदिर प्रवेशाची बंदी उठवली होती. आदेशानंतर मंदिरात प्रवेश करणाऱ्या काही महिलांना भक्तांकडून प्रचंड विरोध झाला होता. हा विरोध सुरू असतानाच काही महिला या गाजावाजा न करता गुपचूप जाऊन दर्शन घेऊन आल्याचं केरळ सरकारच्या आकडेवारीवरून कळालं आहे.

मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या बिंदू अम्मिनी आणि कनकदुर्गा या दोघींनी सर्वोच्च न्यायालयात आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली आहे. दर्शन घेतल्यानंतर काही दिवसांनी कनकदुर्गा जेव्हा घरी गेली, तेव्हा तिला सासूने मारहाण केली होती. यामुळे आपल्याला संरक्षण मिळावे अशी या दोघींनी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या