
पश्चिम बंगालच्या हुगळी येथे राहणाऱया सहा वर्षांच्या मुलाने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 30 सेपंदांत त्याने 58 पुशअप्स मारले आहेत. त्याच्या या कामगिरीची नोंद नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. राजनाथ दत्त असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर काwतुकाचा वर्षाव होतोय. राजनाथ हा मजुराचा मुलगा आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्याच्या आईवडिलांना खेळाची आवड होती; परंतु परिस्थितीमुळे पुढे त्यांना आपली आवड जपता आली नाही. आपले अधुरे स्वप्न मुलांनी पूर्ण करावे यासाठी दोन्ही मुलांना ते प्रोत्साहन देतात.
























































