
5 जी इंटरनेट सेवा आता 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानावर केले जाणार आहे. सरकारने अल्प कालावधीत देशात 5 जी दूरसंचार सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 5जी दूरसंचार सेवा देशभरातील सुमारे 13 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. 5जी वापरकर्त्यांना 4 जी पेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे.



























































