धुळ्यात 60 टक्के, तर नगरमध्ये 67 टक्के मतदान; सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

धुळे व नगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी 60 आणि 67 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6,  अनुसूचित जमातीसाठी 5,  तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या. नगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी मतदान झाले. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. मतमोजणी सोमवारी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.