मानवनिर्मित प्रदुषणामुळे दरवर्षी 60 ते 70 लाख लोकांचा मृत्यू, संयुक्त राष्ट्राची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात आकस्मिक आणि आजारपणांमुळे जेवढे मृत्यू होतात त्यापैकी एक चतुर्थांश मृत्यू हे मानवनिर्मित प्रदुषण आणि पर्यावरणाला हानी पोहोचल्यामुळे होतात. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे. श्वास कोंडणारे कार्बन उत्सर्जन, रसायनांमुळे होणारे जलप्रदुषण आणि जैवविविधतेचे होणार्‍या हानीमुळे जगातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठे नुकसान होत आहे.

विकसित देशात वाढणारा चंगळवाद, प्रदुषण आणि अन्नाची नासाडीमुळे जगात भूकबळी, गरीबी आणि रोगराई पसरत चालल्याचे अहवालात म्हटले आहे. दर सहा वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध होतो. 70 देशांच्या 250 संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे. हरित गृहातील उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळेच दुष्काळ, पूर आणि वादळ सारख्या नैसर्गिक आपत्ती वाढत आहे. तसेच समुद्राच्या पाण्याचा स्तरही वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्वच्छ पाण्याअभावी दरवर्षी 14 लाख लोकांचा मृत्यू होत असल्यचे अहवालात म्हटले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जंगलतोड व जमिनीत क्षार वाढल्याने 302 कोटी लोकांना फटका पडतो. तसेच वायु प्रदुषणामुळे दरवर्षी 60 ते 70 लाख लोकांचा आकस्मिक मृत्यू होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.