
बंगळुरूमधील 68 शाळा बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा ई मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना ही सूचना मिळताच सर्व शाळांची तपासणी केली; परंतु यात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील 68 खासगी शाळा बॉम्बने उडवणार आहे, अशा धमकीचा मेल करण्यात आला. यानंतर खबरदारी म्हणून तत्काळ सर्व शाळांची तपासणी करण्यात आली. याआधीही 15 शाळांना धमकी मिळाली होती, असे कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी सांगितले; परंतु आम्ही कोणतीही जोखीम पत्करू शकत नाही, त्यामुळे तत्काळ सर्व शाळांची तपासणी केली असे ते म्हणाले.



























































