
बावधनची बगाड यात्रा ग्रामस्थांच्या चांगलीच अंगलट आली आहे. आतापर्यंत या परिसरातील तब्बल 77 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आरोग्य अधिकाऱयांना व बंदोबस्तावर असणाऱया उपनिरीक्षकासह आठ पोलिसांनादेखील संसर्ग झाला आहे.
2 एप्रिलला ही बगाड यात्रा झाली होती. संचारबंदी आणि प्रतिबंधित क्षेत्र असताना ग्रामस्थांनी सारे निर्बंध धुडकावून बगाड यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा जपली.याप्रकरणी तहसीलदारांनी सुमारे अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.























































