
अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरातल्या तीन स्पा सेंटरवर एका माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात चार महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या चारही महिला या आशिया खंडातील असल्याचे समजते. रॉबर्ट आरोन लॉन्ग असे त्यागोळीबार करणाऱ्या माथेफिरूचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
#UPDATE | Eight people, including at least four women, have been shot dead at three day spas in the Atlanta, Georgia area, Reuters quoting local media and police
— ANI (@ANI) March 17, 2021
अटलांटा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडमॉन्ट रोडवरील गोल्ड मसाज स्पामध्ये दरोडा घातल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी स्पामध्ये महिला कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्या तिघींचाही गोळीबारात मृत्यू झाला होता.
At least four Asian women have been shot dead at two day spas across the street from each other in Atlanta, and police said they were searching for at least one suspect: Reuters
— ANI (@ANI) March 17, 2021
त्यानंतर काही वेळातच पोलिसांना त्याच स्पाच्या जवळ असलेल्या अॅरोमा थेरपी स्पामध्येही गोळीबार झाला असल्याचा फोन आला. त्या गोळीबारात स्पामधील एका महिलाचा मृत्यू झाला होता.
या दोन्ही घटना घडल्यानंतर तासाभरात त्या घटनास्थळावरून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेरोकी काऊंटी मसाज पार्लरमध्ये गोळीबार झाल्याचे समजले. त्या गोळीबारात चार पुरुषांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर पोलिसांनी चेरोकी काऊंटी मसाज पार्लरच्या आसपास बंदूक हातात घेऊन फिरणाऱ्या एका 21 वर्षीय़ तरुणाला अटक केली. तीनही स्पामध्ये त्यानेच गोळीबार केल्याचे मान्य केले. मात्र त्यामागचे कारण त्याने स्पष्ट केलेले नाही.




























































