बुलढाण्यात कोरोनाचे नवे 88 रुग्ण; 18 रुग्णांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाण्यातून तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 343 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 255 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून 88 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 व रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 124 तर रॅपिड टेस्टमधील 131 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण 255 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

उपचारादरम्यान जागदरी येथील 68 वर्षीय पुरुष आणि जांभोरा ता. चिखली 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी 18 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देऊळगावराजा 3, बुलढाणा 7, जळगाव जामोद 1, लोणार 1, खामगाव 4, नांदुरा 2 येथील रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 17,545 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 2 हजार 124 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 915 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 3 हजार 071 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 2,124 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 899 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.