
मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आज दिवसभरात 9 हजार 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 8 हजार 470 नवीन रुग्ण सापडले. राज्यात आतापर्यंत 57 लाख 42 हजार 258 जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 95.9 टक्के इतके आहे. दिवसभरात 188 जणांचा मृत्यू झाला तर राज्यात मृत्युदर 1.98 इतका आहे. राज्यात सध्या 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 4 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 23 हजार 340 रुग्ण आहेत.


























































