
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. संमेलनाचे आकर्षण असलेल्या ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कुसुमाग्रंजाचे निवासस्थान टिळकनगर येथून दिंडीला सुरुवात झाली. फुलांची सजावट, टाळ मृदुंगाच्या गजर, लेझीमच्या तालाने, नृत्य पथक, शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने उत्साहाच्या वातावरणात दिंडींला सुरुवात झाली. दिंडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या आहेत. नाशिककर पारंपारिक वेशात ग्रंथदिंडीत सहभागही झाले. यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ तसंच कृषी मंत्री दादाजी भुसे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी या दिंडीत सहभागी झाले होते.




































































