
‘बेस्ट’ प्रशासनाने आपल्या 11 लाख वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अदानी’च्या माध्यमातून हे मीटर बसवण्यात येणार असून ग्राहकांना मात्र नऊ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हे पैसे बिलामधून वसूल केले जाणार आहेत. यासाठी पेंद्राकडून फक्त दीड हजाराचे सहाय्य मिळणार आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ने हा निर्णय रद्द करावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. याबाबत ‘बेस्ट कामगार सेना’ अध्यक्ष सुहास सामंत यांनी महाव्यवस्थापक विजय सिंघल यांना निवेदन दिले आहे.
‘बेस्ट’च्या माध्यमातून दक्षिण मुंबईत विजेचा पुरवठा केला जातो. दररोज 800 मेगावॅट पुरवठा यामध्ये केला जातो. या सर्व ग्राहकांना बेस्टकडून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार आहे. मात्र ग्राहकांवर नाहक सक्ती का केली जात आहे, मात्र, अदानीने स्वतŠच्या ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती का करत नाही, असा सवाल सुहा सामंत यांनी केला आहे. या उपक्रमाबाबत अजूनही कर्मचाऱयांमध्ये संभ्रम आहे. या अन्यायकारक सक्तीविरोधात पावसाळी अधिवेशात शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित करूनही आतापर्यंत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
या प्रश्नांची उत्तरे द्या
- स्मार्ट मीटरमुळे बेस्टला कोणता मोठा आर्थिक फायदा होणार?
- स्मार्ट मीटर लावल्यानंतर मीटर वाचन कशाप्रकारे होणार?
- वीजचोरीवर कशा प्रकारे आळा घालण्यात येणार आहे?
- ‘बेस्ट’कडून याबाबत कोणती माहिती घेण्यात आली आहे?
- ही योजना फसल्यास बेस्टकडे कोणता पर्याय आहे?






























































