
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
आयकर विभागाने बंगळुरू येथील आर्थिक गुन्ह्यांसाठीच्या विशेष न्यायालयात हवाला प्रकरणी आज तक्रार दाखल केली आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये काँग्रेसचे आमदार आणि जल स्त्रोत मंत्री डीके शिवकुमार यांचेही नाव आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Income Tax Department filed a complaint before Special Court for Economic Offences, Bengaluru, in which the Karnataka Minister DK Shivakumar has been accused of operating a hawala network. (file pic) pic.twitter.com/GgrqBm82gt
— ANI (@ANI) June 21, 2018
गेल्या महिन्यात केन्द्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या बंगळुरू, कनकपुरा आणि रामनगर येथील घरांवर आणि कार्यालयांवर छापे घातले होते. या लोकांवर नोटबंदीच्या काळात गैरमार्गानं नोटा बदलून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामध्ये शिवकुमार यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार दाखल करताना शिवकुमार यांचेही नाव नोंदवण्यात आले आहे.
























































