
सामना ऑनलाईन । मुंबई
अंधेरी येथे रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या गोखले पूलाचा एक भाग मंगळवारी सकाळी कोसळला. पण सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही याचे श्रेय पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना जात आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनातेमुळेच शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचले आहेत.
सावंत मंगळवारी सकाळी बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाडीमध्ये आपली ड्युटी करत होते. लोकलने अंधेरी स्थानक सोडले तेवढ्यात सावंत यांना पूलाचा काही भाग कोसळताना दिसला. पूल आणि गाडी यात ६५ मीटरचे अंतर होते. गाडीने ५० प्रतिकिमीचा वेग पकडला होता. पण पूल कोसळत असल्याचे बघून सावंत यांनी इमरजर्न्सी ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. अन्यथा पूल गाडीवरच कोसळला असता आणि मोठा अनर्थ घडला असता. सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे त्यांच्यावर सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण मी फक्त माझ काम केलं असं उत्तर सावंत शांतपणे देत आहेत.





























































