नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना आमदारांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कोकणातील राजापूर येथील विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या आग्रही मागणीसाठी शिवसेना आमदारांनी नागपूर येथील विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.

यावेळी शिवसेना आमदार सर्वश्री सुनील प्रभु, वैभव नाईक, सदानंद चव्हाण, राजन साळवी, प्रताप सरनाईक, डॉ.सुजित मिणचेकर, प्रकाश फातर्फेकर, दयानराज चौगुले, अजय चौधरी, तुकाराम काते आदी सर्व शिवसेना आमदार उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत सर्व शिवसेना आमदारांनी नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहीजे अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. नाणार प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.