
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे –इन यांनी नोएडामध्ये सोमवारी सॅमसंग कंपनीच्या नव्या मोबाईल निर्मितीच्या कारखान्याचे उद्घाटन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नोएडामधील सेक्टर ८१ मध्ये हा कारखाना असून मोबाईल निर्मितीचा जगातला सर्वात मोठा कारखाना आहे.
I congratulate the team of @Samsung_IN and convey my best wishes to them on the inauguration of the Noida mobile unit. Samsung is one of the several companies from the Republic of Korea that are making a mark globally, endearing themselves to people from all walks of life. pic.twitter.com/M6xQ48d6e3
— Narendra Modi (@narendramodi) July 9, 2018
हा कारखाना नोएडात ३५ एकरांवर पसरला आहे. या प्लांटची निर्मिती तब्बल ५ हजार कोटी रुपयांत झाली आहे. सध्या सॅमसंग कंपनी हिंदुस्थानात ६.७ कोटी स्मार्टफोनची निर्मिती करत आहे, हा प्लांट कार्यरत झाल्यानंतर ही संख्या १२ कोटींवर पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यांनी मिळून या कारखान्याचे उद्घाटन केले. मून यांचा हा पहिला हिंदुस्थान दौरा असून त्यांच्या सोबत त्यांची पत्नी किम जुंग – सुक मंत्रीमंडळातील वरिष्ठ नेते, अधिकारी आणि १०० उद्योगपतीही आले आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून हिंदुस्थान दौर्या दरम्यान सायबर सुरक्षा करारावार सही करतील असा अंदाज आहे.



























































