मोदींना मिळाला जावई, सोनिया गांधींना मिळाली सून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहतात, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अद्याप लग्नच झालेले नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदींना जावई मिळाल्याची आणि सोनिया गांधींना सून मिळाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

त्याचे झाले असे की, काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन विंगच्या अध्यक्षा दिव्या स्पंदन यांनी ९ जुलै रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आयटम गर्ल राखी सावंत हिचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडशी सर्वांची ओळख करून देत आहे. तसेच पंतप्रधान मोदींना मी फार आवडते, त्यामुळे तू त्यांचा होणारा जावई आहेस असे ती तिच्या बॉयफ्रेंडला सांगताना दिसत आहे. दिव्या स्पंदन यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

दिव्या स्पंदन यांच्या या व्हिडीओनंतर भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक महिला तिला राहुल गांधींसोबत लग्न करायचे असल्याचे सांगत आहे.