
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूर- गगनबावडा रोडवर दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या या अपघातात, एका महिलाचा मृत्यू झाला असून १२ प्रवासी जखमी झाले आहेत.
दोन्ही बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करत होते. सतत पाऊस पडत असल्याने शहरात प्रचंड धुके निर्माण झाले होते. पाच फुटांच्या पुढे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात एका ६२ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, दरम्यान अपघातामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.




























































