गोव्यात आसामी दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पणजी

पणजीतील सेंट इनेज येथे आसामी दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हे दाम्पत्य येथे भाड्याच्या घरात राहत होते. मंगळवारी सकाळी यातील महिला बेडवर मृतावस्थेत आढळली. तर पुरूषाचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे हे आत्महत्येचे प्रकरण असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.