भगवान गडावर जमावबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhagwan gad

उदय जोशी । बीड

वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून भगवान गडावर दाखल झालेल्या फुलचंद कराड यांनी मंदिरात बैठक झाल्याचा दावा करीत आंदोलन यापुढे तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 16 सप्टेंबरला पुण्यात व्यापक मेळावा घेऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही,अवघ्या अर्ध्या तासात कराड गडावरून रवाना झाले

वंजारी समाजाला ओबीसी मध्ये घेण्यात यावे यासाठी भगवान सेनेचे सरसेनापती तथा पंकजा मुंडे यांचे समर्थक फुलचंद कराड यांनी भगवान गडावर मेळावा घेण्याचे जाहीर केले होते, त्याला नामदेव शास्त्रीमहाराज यांनी विरोध केला होता, त्यामुळे संघर्ष होण्याची चिन्हे होती,मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.