
सामना ऑनलाईन । दुबई
परंपरागत प्रतिस्पर्धी हिंदुस्थानकडून दोनदा पराभूत व्हावे लागल्याचा धसकाच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी घेतला आहे. पाकचा संघ त्यामुळे आत्मविश्वासच गमावून बसल्याची कबुली पाकिस्तानी संघ प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिली आहे. यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी संघ अतिशय वाईटच खेळाला आहे असे हताश उद्गार काढत आर्थर यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आता तरी खेळ सुधारा अशा कानपिचक्याही दिल्या.
‘क्रिकेटवाली गर्ल’! अखेर नेटकऱ्यांनी ‘त्या’ सुंदर पाकिस्तानी तरुणीला शोधलंच
हिंदुस्थान हा जगातला बलवान क्रिकेट संघ आहे .त्यामुळे या संघाविरुद्ध खेळताना तुमची सामन्यावरील पकड थोडी जरी ढिली झाली तरी तुम्हाला त्याचे परिणाम भोगायला लागणार याचे भान ठेऊन खेळायला हवे होते असे खडे बोल पाकिस्तानी संघाला सुनावत आर्थर पुढे म्हणाले, आम्हाला प्रथम फलंदाजी करताना चांगली धावगती राखता आली नाही. त्यामुळे 237 धावांपर्यंतच आम्ही मजल मारू शकलो. त्यानंतर गोलंदाजांकडूनही निराशा झाली. यादरम्यान आम्हाला एक-दोन संधी चालून आल्या मात्र त्याचा आम्ही फायदा उठवू शकलो नाही आणि सामना आमच्या हातून निसटला, अशी कबुलीही आर्थर यांनी दिली.
अखेरच्या षटकातील धोनीचा जुगार व टीम इंडियाने जिंकला टी-20 वर्ल्डकप…
सर्वोत्तम अशा हिंदुस्थानी संघाकडून पाकिस्तानचा पराभव झाला आहे हे वास्तव पाकिस्तानी खेळाडूंना स्वीकारावेच लागणार आहे. मात्र या पराभवातून काहीतरी धडा घ्या, अन्यथा या स्पर्धेत पुढे तुमची धडगत नाही
– मिकी आर्थर , पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा खेळ आणि मैदानातील त्यांचे कौशल्य अफलातूनच होते .त्यांनी खेळाच्या प्रत्येक अंगात आम्हाला चारी मुंड्या चीत केलेय हे मान्य करायलाच हवे. आता पुढची लढत आमच्यासाठी “करो वा मरो” अशीच असेल याचे भान ठेवून आम्ही खेळू
– सर्फराज अहमद, पाकिस्तानी कर्णधार



























































