जम्मू कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील बारमुल्ला जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांकडून एके ४७ रायफल आणि चायनिज बंदूका आणि इतर काही शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. अद्याप या भागात शोध कारवाई सुरू असून आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बारामुल्लाच्या क्रल्हार भागातून जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यावर या दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर पोलीस व सीआयपीएफचे जवान यांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.