
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सार्क संमेलनासाठी पाकिस्तान सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवणार आहे. विदेश मंत्रालयाच्या हवाल्याने डॉन वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. जर पंतप्रधान मोदी या सार्क संमेलनात सामील झाले तर इमरान सरकारच्या कारकीर्दीत मोदींचा हा पहिला दौरा ठरेल.
Indian PM Narendra Modi to be invited to attend SAARC summit, says Pakistan Foreign Office: Dawn News pic.twitter.com/b0bj2MQDlB
— ANI (@ANI) November 27, 2018
२० वे सार्क संमेलन हे पाकिस्तानात होणार आहे. २०१६ मध्ये १९ वे सार्क संमेलन पाकिस्तानमध्ये होणार होते. पण तेव्हा हिंदुस्थानने विरोध केला होता. त्यानंतर बांग्लादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनीही या संमेलनावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे हे संमेलनच रद्द करण्यात आले होते.































































