
सामना ऑनलाईन । मुंबई
ऑस्टियोपोरोसिससारखे आजार हाडे कमजोर झाल्यामुळे होतात. पण आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असतील तर हाडे मजबूत होतील. मग गुडघे दुखण्याचा विकारही दूर ठेवता येतो. म्हणून हाडे मजबूत करणारे पदार्थ कोणते ते पाहूया…
आहारात नियमित बदाम असतील तर शरीराला भरपूर कॅल्शियम मिळेल. बदामांमुळे सांध्यांमधील वंगण वाढते. कारण बदामात ई जीवनसत्त्व आणि एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात.
दररोज किमान एक सफरचंद खाल्ले तर सांधेदुखी आणि इतर समस्यांपासून बचाव करता येतो. कारण सफरचंद सांध्यांमध्ये बोन म्यारो तयार करण्यासाठी मदत करते. शिवाय रोज एक सफरचंद खाल्ल्याने गुडघेदुखीपासून बचाव होतो.
हाडांना होणारा त्रास टाळायचा असेल तर रोज एक कप ग्रीन टी प्या. कारण यातील ऍण्टीऑक्सिडेंटमुळे हाडांचे नुकसान टळते. त्यामुळे सांधेदुखीपासून सुटका होते.
घरात कधीही आले मिळू शकते. त्या आल्यामधील औषधी तत्त्व केदना आणि सूज वेगाने कमी करतात. त्यामुळे चहामध्ये किंवा खाण्याच्या पदार्थांमध्ये आले घातले तर वेदना व सूज कमी होते.
हाडांच्या कमजोरीमुळे गुडघे दुखत असतील तर पपई खा. कारण पपईमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. ज्या लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते त्यांना सांधेदुखी होते.
ब्रोकोली खाणे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते. कारण त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. ब्रोकोलीत कॅल्शियम मुबलक असल्याने हाडे मजबूत होतात. तीन ते चार वेळा ब्रोकोलीचे सेवन आठवडय़ात केल्यास स्तनाचा, प्रोस्टेट (मूत्राशयाचा निमुळता भागाकर असणारी ग्रंथी) कर्करोग टाळता येतो.




























































