प्रातःस्वर : अभिजात शास्त्रीय संगीताचे शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिल्पा सुर्वे

पंचम निषादची ‘प्रात:स्वर’ मैफल 13 जानेवारी रोजी शतक पूर्ण करीत आहे. अभिजात हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीताचा वारसा पुढे नेण्यात ‘प्रात:स्वर’चे मोठे योगदान आहे. जे फक्त कलाकारांवर प्रेम करतात त्यांना मर्यादा येतात. मात्र कलेवर प्रेम करणारी व्यक्ती जे उत्तम असेल तिथे येतेच, या विश्वासावर प्रात:स्वरचे 13 वर्षांची अविरत वाटचाल सुरू आहे, त्याबद्दल सांगताहेत पंडित सी. आर. व्यास यांचे धाकटे सुपुत्र शशी व्यास…

प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी होणाऱया पंचम निषादच्या प्रात:स्वर मैफलीची रसिक आतुरतेने वाट बघत असतात. समृद्ध अनुभव देणाऱया या मैफलीबद्दल काय सांगाल?
– प्रात:स्वर ही सकाळच्या रागांची मैफल आहे. शास्त्रीय संगीतात अजूनही प्रहर संगीत गायले जाते. बिभास, भटियार, ललत, देशकार, परज कालिंगणा, परज परमेलप्रवेश हे पहाटेचे राग आहेत. सकाळी भैरव थाट, राग अहिरभैरव, रामकली, बिलावल, हिंडोल, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी असे राग आहेत. मुंबईत प्रातŠस्वर मैफलीची सुरुवात 2000 सालापासून आम्ही केली. 13 जानेवारी रोजी बेगम परवीन सुलताना यांची 100 वी मैफल रविंद्र नाटय़मंदिराच्या प्रांगणात सकाळी होत आहे. आमच्या आधी चतुरंग प्रतिष्ठान दिवाळी पहाटेच्या निमित्ताने अशा मैफलीचे आयोजन करीत होते, मात्र ते वर्षातून एकदा. आम्ही मात्र वर्षाचे आठ महिने निसर्गरम्य वातावरणात ही सूरमैफल आयोजित करीत आहोत. आमचे वेगळेपण म्हणजे आम्ही आर्टिस्ट रिपीट करीत नाही. आतापर्यंत 99 कार्यक्रमांमध्ये 98 कलाकार सहभागी झालेत. फक्त जयतीर्थ मेवुंडी यांना दोन वेळा बोलावले. अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, मंजिरी असनारे केळकर, रमाकांत गायकवाड अशी किती नावे घेऊ.

पंचम निषाद ही हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीतातील पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तिची स्थापना कशी झाली?
– पंचम निषादची स्थापना 1996 साली सहजरीत्या झाली. ही अभिजात शास्त्र्ााrय संगीतातील पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तोपर्यंत सगळे कार्यक्रम ट्रस्टच्या माध्यमातून व्हायचे, संगीताचा फक्त चॅरिटी म्हणून विचार केला जायचा. आम्ही ट्रस्टऐवजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभारायचे ठरवले. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यावर जबाबदारीची जाणीव होते आणि जिथे जबाबदारी असते तिथे कामे आपसूकच पुढे जातात. आम्ही कार्यक्रमांसाठी प्रायोजक आणायला सुरुवात केली. अभिजात संगीत ही प्राचीन सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे, त्यामुळे त्याला मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे. हे भान आम्ही प्रायोजक कंपन्यांमध्ये जागवले. कला, संस्कृती जतन करणे, तिचा प्रसार करणे ही कॉर्पोरेट सोशल जबाबदारी आहे हे समजवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. पंचम निषादची स्थापना करणारे आम्ही सातही सीए होतो. मला गायकीत करीयर करण्यापेक्षा सीए करण्यात रस होता. आयसीएआयच्या ताब्यातील वसई येथील सीए हॉस्टेल बांधण्याचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत होता. त्यांच्या पदाधिकाऱयांनी सांगीतिक कार्यक्रम करून निधी उभा करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. हा कार्यक्रम मी सलग तीन वर्षे जमवून आणला. अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. बघता बघता सीए हॉस्टेलचे 240 मुलांच्या निवासी वसतिगृहाचे काम मार्गी लागले. मी 1996 पर्यंत फक्त सीए होतो. त्याच वर्षी पंचम निषादची स्थापना केली. प्रत्यक्ष काम 2000 पासून सुरू केले.

संस्थेची स्थापना करून ती पुढे नेण्यात तुमचे बाबा म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील आदरणीय नाव पंडित सी. आर. व्यास यांचे मार्गदर्शन कसे लाभले?
– तिकीट काढून संगीताचा आनंद घेण्याची सवय बाबांच्या म्हणजे पंडित सी. आर. व्यास यांच्या आधी पंडित भीमसेन जोशी यांनी लावली, तर बाबांनी सांगीतिक कार्यक्रमाला प्रायोजकत्व मिळवून देण्यास सुरुवात केली. सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करून निधी गोळा करताना तो तिकीट विक्रीतून म्हणजे प्रेक्षकांच्या सहभागातून उभारयचा, ही बाबांची संकल्पना. तोपर्यंत शास्त्र्ााrय संगीत फुकट ऐकायचे आणि सादर करायचे. कुणीतरी एखादा उद्योजक, श्रीमंत व्यक्ती कलाकारांच्या मानधनाची जबाबदारी उचलायचा. बाबांनी बर्कले ड्रामा फेस्टिवलचे यशस्वी आयोजन केल्यामुळेच महाराष्ट्र ललित कला अकादमी आणि गुणीदास संमेलन सुरू झाले. गेल्या 40 वर्षांत सचोटीने आणि दर्जेदारपणे सादर होणारे गुणीदास संमेलन म्हणजे अभिजात संगीताचा एकमेव ब्रँडेड इव्हेंट ठरला आहे.

गायकांच्या शोधाचा हा प्रवास कसा झाला?
– हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीचे वर्ष-दोन वर्षे स्वतŠचे पैसे घातले. कमर्शिअल कॉन्सर्ट करून त्या पैशांतून आरोही कार्यक्रम 17 वर्षे केला. अगदी 17 ते 25 वर्षे वयोगटातील तरुण कलावंतांना व्यासपीठ दिले. उदयस्वर, प्रातŠस्वरसारखे कार्यक्रम केले. आजही काही संस्था फक्त दहा कलावंतांभोवती फिरताना दिसतात. आम्ही शेकडो कलावंत शोधले. चांगल्या कलाकारांना व्यासपीठ दिले. पहिला आरोही कार्यक्रम त्यामध्ये जयतीर्थ मेवुंडी, मंजिरी असनारे केळकर, अमनअली, राहुल शर्मा, संजीव चिमलगी, नीलाद्री कुमार हे सगळे होते. आज हे सगळे नॅशनल आर्टिस्ट आहेत.

गानस्वरस्वती किशोरी आमोणकर आणि ‘बोलावा विठ्ठल’ याबद्दल तुमच्याकडे खूप काही सांगण्यासारखे आहे.
– किशोरीताईंचा ‘माझे माहेर’ हा अभंग मी कित्येक वेळा ऐकला होता. एका भेटीत ‘भीमसेनजींची संतवाणी गाजली, माझी अभंगवाणी चालली नाही. माझ्या रचना लोकांपर्यंत पोचल्या नाहीत,’ अशी खंत किशोरीताईंनी व्यक्त केली. मी त्यांना म्हटलं की, तुमच्या कार्यक्रमाचं ‘तोचि नादु सुस्वरू जाला’ शीर्षक अतिशय क्लिष्ट आहे. तुम्ही मला नाव बदलायला परवानगी द्या, बघा दोन दिवसांत तुमचा कार्यक्रम हाऊसफुल्ल करतो. मी ‘बोलावा विठ्ठल’ हे नाव सुचवले. पुढे ‘बोलावा विठ्ठल’ने कसे विक्रम मोडले हे तुम्ही जाणताच.

शास्त्रीय संगीताचा वारसा जपताना कोणती आव्हानं जाणवतात?
– हिंदुस्थानी अभिजात शास्त्र्ााrय संगीताचा श्रोता एकत्रित टिकवून ठेवणे आणि त्याला सातत्याने ऐकवण्याची सवय लावणे हे खरंच आव्हानात्मक आहे. कला आणि कलाकार यातील फरक लक्षात आला की आपसूकच संगीताचे कान तयार होतात. जो कला ऐकतो तो साधक आहे. संगीताचे श्रोते वाढवण्याचे खरे श्रेय अशा साधकांनाच जाते. कला दोन प्रकारचे लोक ऐकतात. एक तर कलाकारांवर प्रेम करणारे म्हणजे व्यक्तिपूजक श्रोते असतात तर दुसऱया प्रकारात कलेवर प्रेम करणारे श्रोते असतात. ज्या दिवशी कोण गाणार याच्यापेक्षा काय गायलं जाण्याची शक्यता आहे, हे माहिती करून रसिक तिथे जाईल तो सुदिन असेल. कलेसाठी कलाकार आहे. कलाकारासाठी कला नाही.

– [email protected]