शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी सुचवलेल्या 2 कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मेहकर

शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी सुचवलेल्या अंदाजे 2 कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे योजनेतून ही विकास कामे होणार आहेत. याकरिता आमदार संजय रायमूलकर यांनी शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे प्रस्ताव देऊन वेळोवेळी भेट घेतली. मंत्री दादासाहेब भुसे यांनी आमदार रायमूलकर यांनी सुचवलेल्या सर्व कामांना मंजुरी दिली. जि.प. मार्पâत ही कामे होतील व मंजूर कामांना एलआरएस प्रणालीने निधी वितरित होईल.

जि.प. शाळांसाठी 32 लक्ष खर्च होणार
आमदार संजय रायमूलकर हे जि.प. शिक्षकांचे चिरंजीव असून, जि.प. शाळा दर्जेदार व्हाव्या ही त्यांची मनोमन इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी लोणार तालुक्यातील जि.प. शाळेत डिजीटल व्यवस्था व आरओ प्रणालीसाठी 32 लक्ष रुपये मंजूर करून आणले आहेत. लोणारमधील सावरगाव मुंढे, अंजनी, शारा, रायगाव, पांग्रा डोळे, गोत्रा, मढी, पिंपळनेर, गंधारी, जांबुल, कोयाळी दहातोंडे, देऊळगाव कुंडपाळ, देऊळगाव वायसा, येवती, नांद्रा, खुरमपूर, अजीसपूर, उदनापूर, टिटवी येथील जि.प. शाळेत प्रत्येकी एक लक्ष रुपयांची आरओ प्रणाली बसणार तर सावरगाव मुंढे, अंजनी, शारा, रायगाव, पांग्रा डोळे, गोत्रा, मढी, पिंपळनेर, गंधारी, जांबुल, कोयाळी दहातोंडे, देऊळगाव कुंडपाळ, देऊळगाव वायसा, येवती, नांद्रा, खुरमपूर, अजीसपूर, उदनापूर, टिटवी या शाळांना डिजिटलसाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांचे साहित्य मिळणार आहे.