वानखेडे स्टेडियमला जोडणारा धोकादायक पादचारी पूल बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

चर्चगेट रेल्वे स्टेशनजवळील वानखेडे स्टेडियमला जोडणारा धोकादायक पूल आजपासून रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल बंद केल्यामुळे आता क्रिकेटरसिक आणि नागरिकांना चर्चगेट स्टेशन किंवा मरीन लाइन्स पादचारी पुलाचा वापर करावा लागणार आहे. हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर पालिकेने सर्व अतिधोकादायक पूल बंद केले आहेत. अशा 18 अतिधोकादायक पुलांपैकी काही पूल पाडण्यात आले आहेत.

आता श्री पाटण जैन मंदिर रोडवरील हा पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलावरून स्टेडियमच्या गेट क्रमांक चार येथे उतरता येत होते. यामुळे स्टेडियमवर येणारे क्रिकेटप्रेमी तसेच परिसरातींल पालक व विद्यार्थीदेखील या पुलाचा वापर करीत असत. आजपासून हा पूल बंद झाल्यामुळे कला निकेतन येथील पूल किंवा मरीन लाईन्स रेल्वे स्थानकातील पुलाचा वापर करावा लागणार आहे.