
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालघर जिल्ह्यातील दोन दिवसांच्या संपर्क संवाद दौऱ्यास मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदानी तोफ विदर्भ आणि मुंबईत धडाडणार आहे. 7 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यात दोन, 8 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यात दोन अशा एकूण चार सभा विदर्भात होणार आहेत. तर मंगळवारी 9 एप्रिल रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवरही मुंबईतील पहिली सभा होणार असून उद्धव ठाकरे यांच्या या जंगी सभा विरोधकांना ‘दे धक्का’ देणाऱ्या ठरणार आहेत.
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या साक्षीने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पालघर जिह्यात 2 व 3 एप्रिल रोजी सलग दोन दिवस संपर्क संवाद दौरा झाला. या दौऱ्यात तब्बल 600 किलोमीटर परिसरातील गावागावात जाऊन उद्धव ठाकरे यांनी पालघरवासीयांशी संवाद साधला. त्यानंतर आता त्यांच्या जाहीरसभांचा धडाका सुरू होणार आहे. उन्हाचा पारा जसजसा वाढत चालला आहे. तसतसा प्रचारही तापू लागला असून रणरणत्या उन्हातही विदर्भ, मुंबईतील सभा रेकॉर्डब्रेक अशाच ठरणार आहेत.
रविवार, 7 एप्रिल
लोकसभा क्षेत्र – रामटेक
सायंकाळी 5 वाजता – कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगण, कळमेश्वर शहर.
सायंकाळी 7 वाजता – तेजाब कंपनी ग्राऊंड कन्हान.
सोमवार, 8 एप्रिल
लोकसभा क्षेत्र – यवतमाळ
दुपारी 3 वाजता – वणी.
सायंकाळी 6 वाजता – पोस्टल ग्राऊंड, समता मैदान, यवतमाळ
मंगळवार, 9 एप्रिल
लोकसभा क्षेत्र – दक्षिण मुंबई
सायंकाळी 6 वाजता – महालक्ष्मी रेसकोर्स





























































