19 वर्षांच्या न्यायालयीन लढय़ानंतर पालिकेचा कर्मचारी पुन्हा सेवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पालिकेच्या अग्निशमन दलातील एक कर्मचारी तब्बल 19 वर्षांच्या न्यायालयीन लढय़ानंतर पालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू झाला. सुनील काशिनाथ यादव असे या कर्मचाऱयाचे नाव आहे. यादव याने आज धारावी येथील अग्निशमन केंद्रावर कार्यभार स्वीकारला.

यादवची 2000 मध्ये तीन महिन्यांची अग्निशामक म्हणून सेवा झाल्यानंतर त्याच वर्षी बडतर्फ करण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टापर्यंत बाजू मांडल्यानंतर त्याला निर्दोष मुक्तता झाल्यामुळे आता त्याला 19 वर्षांचे पूर्ण वेतन, बोनस, एलटीए, रजेचे लाभ मिळणार आहेत. न्यायालयात यादवची बाजू मांडणारे ऍड. प्रकाश देवदास, ऍड. विदुला पाटील यांनी ही माहिती दिली. यादवच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर खटला दाखल झाल्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही अद्याप सेवेत घेण्यात आले नव्हते, अशी माहितीही ऍड. देवदास यांनी दिली.