आरपीएफच्या ‘ऑपरेशन थंडर’मध्ये 57 तिकीट दलालांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘ऑपरेशन थंडर’ नावाने देशव्यापी धाडसत्र आरंभले असल्याने दलालांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत मध्य रेल्वेच्या पाच डिव्हिजनमध्ये 35 दलालांच्या मुसक्या आवळल्या असून 68 लाख 25 हजार 499 रुपयांची ई-तिकिटे जप्त केली आहेत. तर पश्चिम रेल्वेने 2 लाख 17 हजार रुपये किमतीची 1428 ई-तिकिटे अशा कारवाईत जप्त केली आहेत. पश्चिम रेल्वेने 22 दलालांवर कारवाई केली. रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी आरपीएफ कायदा कलम 143 अंतर्गत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देत देशभरात ‘ऑपरेशन थंडर’ ही मोहीम राबविली आहे.