28 जुलैला कनकिया मान्सून मॅरेथॉन चॅलेंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कनकिया मान्सून मॅरेथॉन चॅलेंज 28 जुलै रोजी  आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये साडेतीन हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग निश्चित आहे. यावेळी 5 किमी, 10 किमी आणि अर्ध मॅरेथॉन 21 किमी. अर्ध्या मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 6 वाजता तर 10 किमी आणि 5 किमीची सुरुवात सकाळी 6.15 वाजता होईल. मॅरेथॉनचा प्रारंभ व शेवटचा टप्पा आयडीएफसी बँक, बीकेसीच्या मागे असेल. रन इंडिया रनद्वारा सादर, कनकिया मान्सून मॅरेथॉन चॅलेंज हिंदुस्थानातील अग्रगण्य मॅरेथॉनसाठी क्वॉलिफायर आहे. या मॅरेथॉनमध्ये अमरजित सिंगसारख्या प्रेरणादायी धावपटूंचा सहभाग असेल जो दृष्टिहीन आहे. या वर्षी कनकिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक, श्रीमान हिमांशु कनकिया सोबत, 100 हून अधिक कॉर्पोरेट नेत्यांनी कनकिया मान्सून मॅरेथॉन चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे.