पुरेसा पाऊस पडत नाही, तोपर्यंत टँकर सुरू ठेवणार : जयदत्त क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

यावर्षीही पुरेसा पाऊस पडला नसल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडून पुरेसे पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाण्याचे टँकर सुरू ठेवण्याचे आदेश रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. चार वर्षापासून सातत्याने बीड जिल्हा दुष्काळाशी सामना करतो आहे. अपुऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले आणि तलाव कोरडे पडले आहेत, तर पिके पाणी नसल्याने माना टाकत आहेत. दोन दिवसाच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर क्षीरसागर आले असता बीड मतदार संघातील अनेक गावच्या लोकांनी टँकर सुरू ठेवण्याची मागणी केली. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध होणे गरजेचे असून पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत टँकर सुरू ठेवण्याचे आदेश जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी आता टँकर सुरू होणार आहे.