कोसळलेल्या शीळ धरणाच्या संरक्षक भिंतीची आमदार उदय सामंत यांनी केली पहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्याला बसला असून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची लगतच्या पाण्याच्या सांडव्याची संरक्षण भिंत कोसळली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेना उपनेते म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी शीळ येथे जाऊन धरणाची पहाणी केली.

संबंधीत यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना भेट नवीन संरक्षण भिंतीसाठी तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, माजी जि.प.उपाध्यक्ष राजेश मुकादम, विभागप्रमुख विजय देसाई जल संपदा विभागाचे ए.सी. दाबाडे, पाटील, उद्योजक संतोष कदम, सुमेश आंबेकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. शीळ, मिरजोळे, केळ्ये गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मिरजोळे येथे जमीन खचण्याचा प्रकार अजून सुरु असून ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत.