
कांदिवली येथे राहणार्या रोशन चव्हाणच्या हत्येप्रकरणी दुसर्या आरोपीला रविवारी बीकेसी पोलिसांनी अटक केली. राहुल सुभेदार गौड असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या महिन्यात बीकेसी पोलिसांना मिठी नदीजवळ तरुणाचा मृतदेह सापडला होता.पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान पोलिसांनी रोशनची ओळख पटवली. तो कांदिवलीच्या लालजी पाडा येथे भावासोबत राहत होता. त्याच्या शेजारी रवी जैस्वाल आणि राहुल गौड हे राहायचे. जैस्वाल आणि चव्हाण याचा शौचालय वापरण्यावरून वाद झाला होता. वादात रवीचा भाऊ शुभमला मारहाण केली होती. त्याचा राग रवीच्या डोक्यात होता. रवीने दारू पिण्याचे निमित्त करून रोशनला राहुलच्या घरी बोलावले. आणखी दारू पिण्यासाठी सहा जण टॅक्सीमध्ये बसून कांदिवली येथून एअरपोर्ट जवळ आले. रोशनला बीकेसी येथील मिठी नदीजवळ आणले. तेथे त्याला मारहाण केली. अपघात झाल्याचे भासवत त्याचा मृतदेह मिठी नदी जवळ टाकून मारेकर्यांनी पळ काढला. बीकेसी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून राहुलला अटक केली.


























































