
जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या शहला रशीद यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थानी लष्कराबाबत आक्षेपार्ह आणि खोटा आरोप करणारे ट्विट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आलोक श्रीवास्तव यांनी या प्रकरणी याविरोधात तक्रार दाखल केली होती. रशीद खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली जावी, अशीही मागणी श्रीवास्तव यांनी केली.
शहला रशीद यांनी 18 ऑगस्टला हिंदुस्थानी लष्कराबाबत आक्षेपार्ह ट्विट करत त्यांच्याकडून खोऱ्यातील लोकांचा शारीरिक मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला होता. रशीद याचा हा आरोप लष्कराने फेटाळून लावला होता आणि ती खोटे बोलत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर अखेर आज शुक्रवारी दिल्लीच्या स्पेशल सेलने रशीदविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
Delhi Police today filed an FIR on criminal complaint by Supreme Court lawyer Alakh Alok Srivastav. The complaint had sought the arrest of activist Shehla Rashid for allegedly spreading fake news against Indian Army. pic.twitter.com/evhf5Bgb9Q
— ANI (@ANI) September 6, 2019
शहला रशीद या जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या आहेत. त्यांनी जम्मू आणि कश्मीर पीपुल्स मूवमेंट (जेकेपीएम) या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा हा पक्ष आहे.




























































