दिल्लीत चार दहशतवादी घुसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर कश्मीर आणि देशभरात घातपाती कारवाया करण्यासाठी दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत. दिल्लीत काल रात्री ‘जैश-ए-मोहम्मद’चे 4 दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्यामुळे खळबळ उडाली. राजधानीत रेड ऍलर्ट जारी करण्यात आला असून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 9 ठिकाणी छापेमारी करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हाफीज सईदच्या ‘जैश-ए-मोहम्मद’चे 3 ते 4 दहशतवादी गेल्या आठवडय़ात दिल्लीत घुसले असून आत्मघाती हल्ला करण्याचा त्यांचा कट आहे, अशी पक्की माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

जम्मूत घुसखोराला अटक

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये हिंदुस्थानी सीमेत घुसखोरी करणाऱ्या एकाला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज अटक केली. त्याला जम्मू-कश्मीर पोलिसांकडे सोपवण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.