
हिंदुस्थानच्या महत्त्वाकांशी योजनांपैकी एक असणाऱ्या चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहीमेला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचा संपर्क तुटल्याने काही अंशी खिळ बसली. ही मोहीम 100 टक्के यशस्वी झाली नसली तरी ऑर्बिटर मात्र अपेक्षेपेक्षाही चांगले काम करत आहे.
चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहीमेदरम्यान संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा (Vikram Lander) शोध घेण्यासाठी अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो (ISRO) आणि नासाने (NASA) जंगजंग पछाडले, मात्र त्याच्याची संपर्कही झाला नाही आणि ते कुठे कोसळले याचा पत्ताही लागला नाही. याच दरम्यान चंद्रावर अंधार पसरल्याने ही शोधमोहीन थंड पडली होती. आता मात्र चंद्रावर पुन्हा एकदा लख्ख सूर्यप्रकाश पसरला असल्याने विक्रमचा शोध घेण्याच्या आशा बळावल्या आहेत. याच दरम्यान अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानेही एक खूशखबर दिली आहे.
जय हिंद! ‘चांद्रयान’ने काढलेला चंद्राचा ऐतिहासिक फोटो इस्त्रोने केला प्रसिद्ध
नासाकडून (NASA) विक्रमचा शोध लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण नासाचे लूनर रिकनँसेंस ऑर्बिटर (एलआरओ) पुन्हा एकदा विक्रम लँडर ज्या भागात कोसळल्या तेथून जाणार आहे. त्यामुळे विक्रमचा शोध लागण्याच्या शक्यता अधिक बळावल्या आहेत. याआधी 17 सप्टेंबरला एलआरओ विक्रम लँडर ज्या भागात कोसळले अशी शक्यता होती तेथून गेले होते आणि काही फोटोही घेतले होते. परंतु चंद्रावर अंधार पसरण्यास सुरुवात झालेली असल्याने फोटोमध्ये विक्रम लँडरचा पत्ता लागला नव्हता.
नासाने आता अधिकृतपणे सांगितले आहे की, ‘एलआरओ विक्रम लँडिंग क्षेत्रातून गेले तेव्हा तिथे अंधार पसरला होता आणि धूळ दिसत होती. यामुळे काढलेल्या फोटोंमधून विक्रमचा पत्ता लँडरचा लागला नाही. विक्रम लँडर कदाचित चंद्रावर पसरलेल्या सावल्यांच्या मागे लपला गेला असावा अशीही शक्यता आहे. आता एलआरओ ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा याच भागावरून जाणार असून तेव्हा मात्र लख्ख प्रकाश असणार आहे. त्यामुळे विक्रम लँडरचा शोध घेण्याच्या आशा बळावल्या आहेत..
#अमेरिकी अंतरिक्ष एजेंसी #नासा ने विक्रम के बारे में कोई सूचना देने की उम्मीद जताई है, क्योंकि उसका लूनर रिकनैसैंस ऑर्बिटर (#एलआरओ) उसी स्थान के ऊपर से गुजरेगा, जिस स्थान पर #भारतीय #लैंडरविक्रम के गिरने की संभावना जताई गई है।
Photo: IANS pic.twitter.com/tt4QnBd0bc
— IANS Tweets (@ians_india) October 15, 2019



























































